बॉक्स ऑफिसवर नीरजाची 'भरारी'

सोनम कपूरच्या नीरजा या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं आहे.

Updated: Feb 22, 2016, 09:11 AM IST
बॉक्स ऑफिसवर नीरजाची 'भरारी' title=

मुंबई: सोनम कपूरच्या नीरजा या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं आहे. या सिनेमाने तीन दिवसांमध्ये 18 कोटींची कमाई केली आहे.  

सिनेमाला मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे सोनम कपूर जाम खुश झाली आहे. कंगणाच्या तनू वेड्स मनू रिटर्न्स आणि ऐश्वर्याच्या जज्बा या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा  नीरजाचं ओपनिंग डे कलेक्शन चांगलं होतं.

नीरजाच्या यशानंतर सोनमचे वडिल अनिल कपूर यांनीही तिला सल्ला दिला आहे. 'नीरजा'ला यश मिळालं असलं तरीही सोनमला आपल्या अभिनयामध्ये आणखी सुधारणा करायला वाव आहे, असं अनिल कपूर म्हणाला आहे.