नवाझुद्दीन सिद्दीकी जाणार चंद्रावर

नवाझुद्दीन सिद्दीकी चक्क चंद्रावर जाणाऱ्या  शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. लेखक- दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान यांच्या 'चंदामामा दूर के' या सिनेमात नवाझ अंतराळवीरची भूमिका साकारणार आहे. 

Updated: Nov 3, 2016, 09:49 PM IST
नवाझुद्दीन सिद्दीकी जाणार चंद्रावर title=

मुंबई : नवाझुद्दीन सिद्दीकी चक्क चंद्रावर जाणाऱ्या  शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. लेखक- दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान यांच्या 'चंदामामा दूर के' या सिनेमात नवाझ अंतराळवीरची भूमिका साकारणार आहे. 

नवाझुद्दीनने एका मुलाखतीत सांगितले, बॉलिवूडमध्ये भविष्यकालीन सिनेमे फारसे बनत नाहीत. मला स्वतःला प्रत्येक सिनेमात नवनवीन प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे या सिनेमाबद्दल जेव्हा मला विचारले गेले तेव्हा नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

नवाझुद्दीन पुढे म्हणाला की, या भूमिकेची तयारी करायला बरेच दिवस लागणार आहेत. कारण या भूमिकेसाठी अंतराळवीरांचा पोशाख, गुरुत्वाकर्षण विरोधी वातावरण या सगळ्याचा अनुभव घ्यायला लागणार आहे.