उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरणार आहे.

Updated: Jan 21, 2017, 09:27 PM IST
उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन  title=

मुंबई : उस्मानाबादमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरणार आहे. मुंबईत नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घोषित करण्यात आला. 7 ते 9 एप्रियदरम्यान यंदाचं नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलंय.

नाट्यसंमेलनासाठी यंदा नागपूर आणि उस्मानाबाद येथील आयोजक उत्सूक होते. त्यामुळे नाट्यसंमेलन नागपूरला होणार की उस्मानाबादला याची उत्सुकता नाट्यप्रेमींना होती. अखेर उस्मानाबादचं नाव निश्चित करण्यात आलं. एरवी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात येतं, मात्र यंदा निवडणुका असल्याने संमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आलीये.