‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेचं गाणं वन शॉटमध्ये चित्रीत

मराठी मालिकांच्या विश्वात कायमच नवनवीन प्रयोग करणारी झी मराठी वाहिनीने आता मालिकेच्या शीर्षक गीता बाबत आणखी एक नवा प्रयोग केलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 19, 2017, 07:38 PM IST
 ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेचं गाणं वन शॉटमध्ये चित्रीत title=

 
मुंबई : मराठी मालिकांच्या विश्वात कायमच नवनवीन प्रयोग करणारी झी मराठी वाहिनीने आता मालिकेच्या शीर्षक गीता बाबत आणखी एक नवा प्रयोग केलाय. 

१८ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेचं शीर्षक कोणत्याही कट विना सलग म्हणजेच वन शॉट शूट करण्यात आलं. 

विशेष म्हणजे यासाठीचा खास सेट गोराई येथील एका बीचवर लावण्यात आला होता. या गाण्यासाठी सर्व कलाकारांनी दोन दिवस विशेष तयारी सुद्धा केली होती. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं. 

जसराज-हृषिकेश-सौरभ यांचं संगीत असलेल्या या गाण्याचे शब्द श्रीरंग गोडबोले यांचे असून ते दीपिका जोग दातार हीने गायलं आहे.