मुंबई : बॉलिवूडमध्ये माझा शारीरिक छळ झाला होता, असा गौप्यस्फोट अभिनेत्री कंगना राणावत हिने केला. बॉलिवूडमध्ये काहीही फुकट नसते. या क्षेत्रात तुम्हाला अशाप्रकारच्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, असे ती म्हणाली.
अधिक वाचा : करिश्माने पैशासाठी माझ्याशी लग्न केले : संजय कपूर
बॉलिवूडमधील एका व्यक्तीकडून माझा शारीरिक छळ केला आहे. बॉलिवूडमध्ये सुरूवातीच्या दिवसांत हा प्रकार घडल्याचे कंगनाने सांगितले. तो खूप कठीण काळ होता. माझा शारीरिक छळ झाला होता. मात्र, आता मला त्याप्रकरणाच्या खोलात जायचे नसल्याचे कंगनाने म्हटले.
पत्रकार बरखा दत्त यांच्या ‘धिस अनक्वाएट लॅण्ड’ या पुस्तकाच्या गुरूवारी झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात कंगनाने हा गौप्यस्फोट केला. यावेळी बरखा दत्त यांनी ती व्यक्ती बॉलीवूड इंडस्ट्रीतीलच होती का, असे विचारले असता कंगनाने होकारार्थी उत्तर दिले. बॉलीवूड इंडस्ट्रीत मार्गदर्शक आणि गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. मी १७ वर्षांची होती.
अधिक वाचा : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा बिकीनीत - फोटो
मी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, त्याला पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. त्यावेळी मला सापळ्यात अडकल्यासारखे झाले होते. एखादी व्यक्ती तुमची मदत करत आहे, असे तुम्हाला वाटते. मात्र, याठिकाणी काहीही फुकट नसते, असे कंगनाने सांगितले.