एमएस धोनी बॉलीवूडमधे....

मेरी कोमनंतर आता प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीवर चित्रपट येऊ घातल्याचे समजते आहे. 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव आहे. 

Updated: Jan 20, 2015, 05:18 PM IST
एमएस धोनी बॉलीवूडमधे.... title=

मुंबई : मेरी कोमनंतर आता प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीवर चित्रपट येऊ घातल्याचे समजते आहे. 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव आहे. 

 
सुशांत सिंह राजपूत चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाला घेऊन धोनीपेक्षा सुशांत सिंह राजपूतच जास्त उत्साहीत असल्याचे बोलले जातं आहे. हा सिनेमा 22 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 
 
नीरज पांडे दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमासाठी चार महिन्यांपासून कठोर मेहनत घेणाऱ्या सुशांतने अखेर सोमवारी ट्विटरवरून ट्विट केले की 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' 22 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. फॉक्स स्टार स्टूडिओ आणि इंस्पायर्ड एंटरटेनमेंट हे सह-निर्माते आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.