८० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला 'ब्रदर्स'चा ट्रेलर

अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मलहोत्रा यांचा अभिनय असलेला ब्रदर्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं लॉन्च झाला. यू-ट्यूबवर असणारा हा ट्रेलर ८०  लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला.

Updated: Jul 28, 2015, 04:01 PM IST
८०  लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला 'ब्रदर्स'चा ट्रेलर title=

मुंबई : अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मलहोत्रा यांचा अभिनय असलेला ब्रदर्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं लॉन्च झाला. यू-ट्यूबवर असणारा हा ट्रेलर ८०  लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला.

सुमारे तीन मिनिटे असणाऱ्या या ट्रेलरची सुरूवात कुस्तीच्या आखाड्याने होते. दोन भाऊ एकमेकांना कसे लढत देतात हे या चित्रपटात दाखवले आहे.

या चित्रपटाचा सह-निर्माता करण जोहर आहे. हा ट्रेलर ८० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेल्याचे त्याने ट्विट करून सांगितले आहे.
 
धर्मा प्रोडक्शन हा चित्रपट निर्मित करत असून अग्निपथ चित्रपटाचा दिग्दर्शक करण मल्होत्राने याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
अक्षय कुमार या सिनेमात अॅक्शन हिरो म्हणून झळकणार आहे.

अॅक्शनने परिपूर्ण असणाऱ्या या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस तसेच जॅकी श्रॉफही आहे. हा चित्रपट १४ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.