VIDEO : नानाच्या 'नटसम्राट'चं पहिलं गाणं 'मिटुनी लोचने'

अभिनेते नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकतंच, या चित्रपटातलं 'मिटुनी लोचने' हे एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Dec 10, 2015, 02:57 PM IST
VIDEO : नानाच्या 'नटसम्राट'चं पहिलं गाणं 'मिटुनी लोचने' title=

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांचा 'नटसम्राट' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकतंच, या चित्रपटातलं 'मिटुनी लोचने' हे एक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीवर आपल्या कथा-आशयानं अजरामर ठरलेलं ‘नटसम्राट’ हे नाटक आता चित्रपटाच्या रूपात आपल्यासमोर येतंय. 'कुणी घर देता का घर' अशी आर्त साद या निमित्तानं नाना पाटेकरांच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. 

व्हिडिओ : नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'चा ऑफिशल ट्रेलर

 

नाना पाटेकर यांच्या व्यतिरीक्त रिमा लागू, विक्रम गोखले हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसत आहेत.  विश्वास जोशी, नाना पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा सिनेमा १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.