माईक टायसनला पहायचाय 'साला खडूस'

चेन्नई : प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीला आनंद झालाय. 

Updated: Feb 3, 2016, 10:42 AM IST
माईक टायसनला पहायचाय 'साला खडूस' title=

चेन्नई : प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीला आनंद झालाय. त्याचं कारणही काहीसं तसंच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साला खडूस' या चित्रपटासंबंधी ही गोष्ट आहे.

माईक टायसनने मंगळवारी 'मला हा बॉक्सिंग विषयीचा चित्रपट पहायचाय' अशी एक पोस्ट टाकली ज्यासोबत त्याने 'इरुधी सुत्तरू' (जो हिंदीत 'साला खडूस' नावाने प्रदर्शित झाला आहे) या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो जोडलाय. त्याचसोबत त्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक भारद्वाज रंगन यांनी या चित्रपटाचा लिहिलेला एक रिव्ह्यूही सोबत दिलाय.

यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा प्रसाद भलत्याच खुश आहेत. "माईकला आमचा चित्रपट पहायचाय हे ऐकून खूप आनंद झालाय. तो माझा आवडता बॉक्सर आहे. तो एकदा म्हणाला होता 'जेव्हा मी माझ्या कोचचं ऐकतो तेव्हा मी सामना जिंकतो, आणि जेव्हा नाही ऐकत तेव्हा हरतो'. बॉक्सर आणि तिचा ट्रेनर यांच्यातील नात्यांबद्दलचा हा चित्रपट आहे. त्यामुळे टायसनला हा चित्रपट पहायचाय हे समजल्यावर मला खूप आनंद झालाय."

'साला खडूस' हा चित्रपट दोन खऱ्या महिला बॉक्सर्सच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटात आर. माधवनने त्यांच्या ट्रेनरचा रोल केलाय. त्यालाही भयंकर आनंद झालाय आर माधवन ने माईकला चित्रपटाची डीव्हीडी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

जागतिक बॉक्सिंग कांस्य पदक विजेता माजी बॉक्सर देवरंजन व्यंकटेशन याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर या चित्रपटाचा रिव्ह्यू जो माईक टायसनने वाचलाय. देवरंजनने हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक सुधासोबत सल्लागार म्हणूनही काम केलं होतं.

 

 

I'd like to see this boxing film

Posted by Mike Tyson on 1 February 2016