भेटा 'हैदर' च्या सलमान आणि सलमानला!

विशाल भारद्वाजची नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘हैदर’ सध्या खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बँग बँग’च्या तुलनेत हैदरची सुरुवात काहीशी कमी कमाईची झाली असली तरी चित्रपट समिक्षकांच्या मते चित्रपट आता चर्चेत येतोय. चित्रपटातील प्रत्येक भूमिका आपआपल्या जागी ताकदीची आहे. पण यासर्वांमध्ये दोन कलाकारांनी सर्वांचं लक्ष खेचलंय... ते म्हणजे ‘सलमान’ आणि ‘सलमान’.

Updated: Oct 8, 2014, 10:03 AM IST
भेटा 'हैदर' च्या सलमान आणि सलमानला! title=

मुंबई: विशाल भारद्वाजची नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘हैदर’ सध्या खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बँग बँग’च्या तुलनेत हैदरची सुरुवात काहीशी कमी कमाईची झाली असली तरी चित्रपट समिक्षकांच्या मते चित्रपट आता चर्चेत येतोय. चित्रपटातील प्रत्येक भूमिका आपआपल्या जागी ताकदीची आहे. पण यासर्वांमध्ये दोन कलाकारांनी सर्वांचं लक्ष खेचलंय... ते म्हणजे ‘सलमान’ आणि ‘सलमान’.
 

जर आपण ‘हैदर’ पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही हे दोन चेहरे पाहिले असेल तर तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की आलं असेल. मात्र जर आपण फिल्म पाहिली नसेल तर पाहा दोन्ही ‘सलमान’ची झलक...

पाहा व्हिडिओ – 

 

 

चित्रपट शाहीद कपूरचा आहे. पण चर्चा ‘सलमान’ची आहे. फिल्म रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी हे स्पेशल ट्रेलर रिलीज करून सलमानच्या फॅन्सला ‘सलमान आणि सलमान’चं गिफ्ट दिलं होतं. पण कमीच लोक या सलमानला रील लाइफमध्ये ओळखतात. इंटरनेटवरही त्यांच्याबद्दल माहिती कमीच आहे. 

१. सुमित कौल – ‘हैदर’च्या पहिल्या सलमानचं खरं नाव सुमित कौल आहे. लाइट्स, कॅमेरा आणि अॅक्शनच्या दुनियेत तो नवा आहे. पण टिव्ही आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या रुपात त्यांनं आपलं सुरू केलेलं करिअर आता चित्रपटांपर्यंत पोहोचलंय. यापूर्वी ‘बंबू’मध्ये पण तो दिसला होता. 

२. रजत भगत -  विकिपीडियापासून युट्यूब आणि ट्विटरपासून फेसबुकपर्यंत शोधल्यानंतर या दुसऱ्या ‘सलमान’ची माहिती मिळालीय. त्यानुसार रजत २०१०मध्ये दोन डॉक्युमेंट्री आणि शॉर्टफिल्म ‘बिवेअर’ आणि ‘बॅकसपोर्ट’चा भाग होते. एक आणखी म्हणजे २०१३मध्ये रिलीज झालेल्या ‘मुंबई मिरर’मध्ये पण त्यानं छोटी-मोठी भूमिका केलेली आहे. 

या दोघांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता मोठ्या पडद्यावरच त्यांना पसंती मिळाली नाहीय, तर इंटरनेटवर सुद्धा त्यांना शोधलं जातंय. विशाल भारद्वाज याबाबतीत स्तुतीस पात्र आहे. त्यांनी एका चांगल्या चित्रपटासोबतच या दोन कलाकारांची ओळख सर्वांना करवून दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.