'पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करकडून रेप!'

एका मॉडेलवरील रेप प्रकरणी डीआयजी सुनील पारस्कर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई क्राईम ब्रान्च या प्रकरणी लवकरच मॉडेल पूनम पांडेची देखिल चौकशी करणार आहे. मॉडेल पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्कर यांनी हे कृत्य केलं आहे, असा आरोप पीडित मॉडेलने केला आहे.

Updated: Jul 31, 2014, 02:14 PM IST
'पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करकडून रेप!' title=

मुंबई : एका मॉडेलवरील रेप प्रकरणी डीआयजी सुनील पारस्कर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई क्राईम ब्रान्च या प्रकरणी लवकरच मॉडेल पूनम पांडेची देखिल चौकशी करणार आहे. मॉडेल पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्कर यांनी हे कृत्य केलं आहे, असा आरोप पीडित मॉडेलने केला आहे.

पीडीत मॉडेलने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलंय, पूनम पांडेच्या सांगण्यावरूनच पारस्कर तिला त्रास देत होता. पूनम पांडे आणि तिच्यात स्पर्धा असल्याने पूनम पांडेने हे काम करून घेतलं आहे.

या वादातून हमेशा प्रसिद्धीच्या झोतात असलेली पूनम पांडे पुन्हा चर्चेत आली आहे. पूनम पांडेची आता चौकशी होणार आहे, यात पूनम पांडेला विचारण्यात येणार आहे की, आरोपी डीआयजी पारस्कर यांच्याशी तुमची ओळख कशी आहे?, पीडीत मॉडेलचा आरोप आहे की, पूनम पांडे आणि डीआयजी यांचे जवळचे संबंध आहेत आणि पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करने आपल्याला त्रास देण्यास सुरूवात केली.

एवढंच नाही पीडित मॉडेल आणि पूनम पांडे यांच्यात काही ट्वीटसही झाले आहेत, पोलिस या प्रकरणाची चौकशी करतायत. 3 जुलै रोजी पीडित मॉडेलने ट्वीट केलं होत की, पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करने हे शोषण केलंय.

क्राइम ब्रांचने पारस्कर द्वारा पीडीत मॉडलला पाठवलेले काही मेसेजेस रिट्वीट केले आहेत. रिट्वीट झालेले ट्वीटनंतर डिलीट करता येत नाहीत. या मेसेजेसवर पारस्करने पीडित मॉडेलकडून माफी मागितली आहे. मात्र कशासाठी ही माफी मागितली आहे, हे ट्वीटमध्ये लिहलेलं नाही.

क्राईम ब्रान्चने बुधवारी पीडित मॉडेलचं स्टेटमेंट, सीआरपीसी कलम 164 प्रमाणे मॅजिस्ट्रेटसमोर रेकॉर्ड केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.