मस्तीजादे quick movie review: डबलमिनिंग मनोरंजन

 सनी लिऑन, तुषार कपूर आणि वीर दास यांचा 'मस्तीजादे' उद्या म्हणजे २९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Jan 28, 2016, 09:06 PM IST
मस्तीजादे quick movie review: डबलमिनिंग मनोरंजन  title=

मुंबई :  सनी लिऑन, तुषार कपूर आणि वीर दास यांचा 'मस्तीजादे' उद्या म्हणजे २९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सनी लिऑन पुन्हा एकदा डबलमिनिंग डायलॉगच्या डबल रोलमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. ही एक सेक्स कॉमेडी असून डबल मिनिंग डायलॉगची आणि सीनची भडिमार यात करण्यात आली आहे. 

मस्तीजादे हा डोकं बाजुला ठेवून पाहण्याचा चित्रपट आहे. तुम्ही यात काही मेसेज कन्टेंट शोधायला जाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. 

चित्रपटात डबल मिनिंग डायलॉगचा भडीमार आहे. सेक्सुअल अलंकारी भाषा, चाळविणारे हावभाव तुमचं वेगळं मनोरंजन करेल. 

तुषार कपूर आणि वीर दास हे जाहिरात तयार करणारे असून त्यांच्याकडे तरूणींना विवस्त्र पाहण्याची सुपर पॉवर आहे.  पण त्यांच्या आयुष्यात लैला आणि लिली या दोन जुळ्या बहिणी येतात आणि त्यांचे आयुष्य बदलते. या जुळ्या बहिणींचा रोल सनी लिऑनने केला आहे. 

या चित्रपटात असे काही सिन आहे ते तुमच्या विनोद बुद्धीला चॅलेंज करतील. तुमचा चित्रपट पाहण्याचा उद्देश सनी लिऑन असेल तर तो पूर्ण होतो कारण ती डबलरोलमध्ये आहे. 

यातील लैला ही सेक्सी दिसली आहे. तर लिलीने कथानक हे जिवंत ठेवल आहे..

एकूणच  फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर फिरणारे अनेक जोक्स यात घुसविण्यात आल्याने तुम्हाला ते माहिती असतील तर तुमच्या जरासा भ्रमनिरास होईल.