अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. निर्माता सुशांत तुंगारे आणि मनवाचे 'शुभमंगल' नुकतेच झाले. ही गोड बातमी दिली तिची मैत्रीण श्रेया बुगडे हिने.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 18, 2017, 02:01 PM IST
अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत title=
छाया सौजन्य - instagram

मुंबई : अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. निर्माता सुशांत तुंगारे आणि मनवाचे 'शुभमंगल' नुकतेच झाले. ही गोड बातमी दिली तिची मैत्रीण श्रेया बुगडे हिने.

अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या मैत्रिणीच्या लग्नाची गोड बातमी शेअर केली आहे. तिने दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरही श्रेयाने काही फोटो अपलोड केले आहेत.

अनेक चित्रपटातून अभिनय करणाऱ्या मनवा नाईक हिने नुकतेच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. 'चूक भूल द्यावी घ्यावी' या छोट्या पडद्यावरील मालिकेची तिने सुशांत तुंगारेसह निर्मिती केली आहे. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्माता असून त्याने मालिकांची निर्मिती केली आहे.

या आधी मनवा हिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री मयुरी वाघ, मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे या अभिनेत्री नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या. आता यात मनवा नाईकची भर पडली.

 

Sisters  the bridesmaids In green.. sharivanaik  posing with our gorgeous manava.naik

A post shared by Shreya Bugde (@shreyabugde) on