VIDEO TRAILER : अॅम सो सॉरी 'लडका' हुआ है!

रेल्वे, बस आणि राजकारणातही स्त्रियांसाठी सिटस् रिझर्व्ह असतात... का? तर इट्स मॅन्स वर्ल्ड आणि 'फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड'... म्हणून!!! पण, त्यालाही नाकं मुरडणारे आहेतच की... 

Updated: Sep 26, 2015, 07:27 PM IST
VIDEO TRAILER : अॅम सो सॉरी 'लडका' हुआ है!  title=

मुंबई : रेल्वे, बस आणि राजकारणातही स्त्रियांसाठी सिटस् रिझर्व्ह असतात... का? तर इट्स मॅन्स वर्ल्ड आणि 'फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड'... म्हणून!!! पण, त्यालाही नाकं मुरडणारे आहेतच की... 

मुंबईत राहणाऱ्या किरणही त्यातलाच... सोसायटी पुरुषांना अन्यायकारक वागणूक देते असं त्याला वाटतंय... म्हणूनच त्यालाही या 'मॅन्स वर्ल्ड'मध्ये स्त्री व्हावसं वाटतंय. 

हे ढोबळ कथानक आहे 'मॅन्स वर्ल्ड' या कॉमेडी वेब सीरिजचं... 'यशराज फिल्म्स'नं ही वेब सीरिज सुरू केलीय. 

यामध्ये, परिणीती चोप्रा, रिचा चढ्ढा, कल्की कोचलीन, भूमी पेडणेकर आणि असे अनेक चेहरे दिसतायत.

चार भागांची ही सीरिज असेल... 29 सप्टेंबर पासून यू ट्यूबवर ही सीरिज प्रदर्शित होईल. तसंच 1 ऑक्टोबर रोजी जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही सीरिज दाखवण्यात येणार आहे.

याच सीरिजचा हा ट्रेलर... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.