हैदराबाद : मकडी, इक्बाल या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये छाप पाडणारी अभिनेत्री श्वेता बासूप्रसादला देहविक्रीप्रकरणी अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. हैदराबादच्या पॉश हॉटेलमध्ये चाललेल्या वेश्याव्यवसाचा भांडाफोड पोलिसांनी केला असून श्वेतासह अनेक बड्या उद्योजकांनाही अटक केली आहे.
टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक सहायक दिग्दर्शक बालू श्वेताची डील करुन द्यायचा. वेश्या व्यवसायासाठी श्वेता एक लाख रुपये घ्यायची, त्यामधील 15 हजार रुपये दलालांना कमिशन म्हणून दिले जायचे.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त एन. कोटी. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बालू याला अटक करण्यात आलीय. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थितीमुळे पीडित अभिनेत्री या जाळ्यात सापडली... ती पीडित असल्यामुळे तिला अटक न करता एका सुधारगृहात पाठवण्यात आलंय. तर बालू याला अनैतिक तस्करी प्रतिबंध अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आलीय.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मकडी या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मकडीनंतर इक्बाल या चित्रपटात तिनं श्रेयस तळपदेच्या बहिणीची छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका केली होती. चित्रपटांशिवाय एकता कपूरच्या कहानी घर घर की या मालिकेतही तिनं काम केलं होतं.
बॉलिवूडनंतर तेलगू सिनेसृष्टीत काम करण्यासाठी श्वेतानं हैदराबाद गाठलं. मात्र तेलगू सिनेमांमध्ये ती फारशी चमकली नाही. दोन दिवसांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स या हॉटेलमध्ये धाड टाकून देहविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई केली. या महिलांमध्ये अभिनेत्री श्वेता बासूप्रसादचा समावेश आहे.
या घटनेनंतर श्वेताना पत्रक काढून परिस्थितीमुळं आपल्याला वेश्याव्यवसाय करावा लागल्याचं म्हटलं आहे. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असून गरजेपोटी हा पेशा स्वीकारला असून आपल्याप्रमाणंच अनेक अन्य कलाकारांवरही ही वेळ ओढवल्याचं तिनं नमूद केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.