शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला आला होता अक्षय कुमारचा राग

बॉलिवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणाऱ्या अक्षय कुमारवर बाका प्रसंग आला होता. शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा 'सिंह इज ब्लिंग'च्यावेळी सिंहाबरोबर शुटींग करत होता.

Updated: Sep 29, 2015, 04:35 PM IST
शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला आला होता अक्षय कुमारचा राग title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणाऱ्या अक्षय कुमारवर बाका प्रसंग आला होता. शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा 'सिंह इज ब्लिंग'च्यावेळी सिंहाबरोबर शुटींग करत होता.

शुटींग ज्या सिंहाबरोबर करण्यात आले त्याचे नाव मुफासा आहे. या सिनेमात अक्षय सुरक्षा रक्षकाची भूमिका साकारत आहे. शुटींगच्यावेळी खूप मजा आली. हे शुटींग केप टाऊन येथील आहे. मी खऱ्या सिंहाबरोबर शुटींग केलेय, असे अक्षयने सांगितले. मात्र, शुटींगच्यावेळी मी खूप घाबरलेला होतो. यावेळी सिंहाला राग आला होता. त्याने शुटींगच्यावेळी लावलेली काच तोडून टाकली. काचेमध्ये सिंहाला वाटले दुसरा कोणतातरी सिंह आला. त्यावेळी त्याने काच तोडली. 

एका सीनसाठी मुफासा (सिंह) याच्यासोबत कारमधून शुटींग केले. तो माझ्यासमोर बसला होता. ट्रेनर माझ्यापासून खूप दूर होता. त्यावेळी मी अक्षयने म्हटले वेळ पडल्यास मला बचावू शकशील ना? मुफासाने ठरविले तर तो काहीही करू शकतो. मात्र, आज घाबरण्याचे कारण नाही. त्याचा मूड चांगला आहे. त्याने खूप खाल्ले आहे, असे ट्रेनरने अक्षयला सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.