ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांची निवृत्तीची घोषणा

ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 2018 साली आपण काम थांबवणार आहोत, असं झुबीन यांनी म्हटलंय. मूळचे मुंबईकर असणा-या झुबीन यांनी नुकतंच 80 व्या वर्षात पदार्पण केलंय.

Updated: Dec 27, 2016, 11:38 PM IST
ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांची निवृत्तीची घोषणा title=

इस्त्रायल : ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 2018 साली आपण काम थांबवणार आहोत, असं झुबीन यांनी म्हटलंय. मूळचे मुंबईकर असणा-या झुबीन यांनी नुकतंच 80 व्या वर्षात पदार्पण केलंय.

अमेरिकेत लॉस एंजेलिसपासून इस्त्रायलपर्यंत अनेक देशात झुबीन यांचे फॅन्स आहेत. विशेष म्हणजे झुबीन काम करत असलेल्या इस्त्रायली ऑर्केस्ट्रालाही यंदा 80 वर्षं पूर्ण होतायत. 1936 साली या ऑर्केस्ट्राला सुरुवात झाली होती. झुबीन मेहता 1961 सालापासून या ऑर्केस्ट्रात काम करतायत. 1981 साली लाईफ टाईम म्युझीक डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. काही महिन्यांपूर्वीच मेहतांनी मुंबईतदेखील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला होता.