ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सहगल यांचं निधन

ज्येष्ठ, सुप्रसिद्ध कलाकार जोहरा सहगल यांचं निधन झालं, जोहरा सहगल या 102 वर्षांच्या होत्या. जोहरा सेहगल 27 एप्रिल 2012 रोजी 100 वर्षांच्या झाल्या होत्या. योगायोगाने भारतीय चित्रपट सृष्टीनेही या वर्षी 100 वर्ष पूर्ण केले होते.

Updated: Jul 10, 2014, 09:18 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सहगल यांचं निधन title=

मुंबई : ज्येष्ठ, सुप्रसिद्ध कलाकार जोहरा सहगल यांचं निधन झालं, जोहरा सहगल या 102 वर्षांच्या होत्या. जोहरा सेहगल 27 एप्रिल 2012 रोजी 100 वर्षांच्या झाल्या होत्या. योगायोगाने भारतीय चित्रपट सृष्टीनेही या वर्षी 100 वर्ष पूर्ण केले होते.

जोहरा सेहगल 100 वर्षांच्या झाल्या होत्या, तेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांना 100 वर्षांची लहान मुलगी असं म्हटलं होतं. जोहरा सहगल यांनी चीनी कम या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली होती.

जोहरा सेहगल यांनी जोहरा सहगल यांचा जन्म सन 1912 मध्ये यूपीच्या सहारनपुरमध्ये झाला होता. जोहरा यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात 1935 मध्ये डान्सर उदय शंकरसोबत झाली होती.

जोहरा यांनी 1946 मध्ये पहिल्यांदा ‘धरती के लाल’ चित्रपटात अभिनय केला. सहगल यांचं वय  80 वर्ष झालं होतं, त्यानंतरही त्यांनी अनेक यादगार भूमिका पार पाडल्या.

जोहरा सहगल यांनी 1998 मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.