दिल, दोस्तीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन

झी मराठी वाहिनीवरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. दोस्तांच्या जीवनावर आधारलेली ही मालिका तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. ही मालिका तरुणांच्या जवळ जाणारी असल्याने अल्पावधीत या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग गोळा केलाय. मालिकेतील कैवल्य, रेश्मा, मीनल, अॅना, सुजय आणि आशू यांची जबरदस्त केमिस्ट्रीमुळे या मालिकेने तरुणांसोबतच आबाललवृद्धांना भुरळ घातलीये. 

Updated: Dec 4, 2015, 01:56 PM IST
दिल, दोस्तीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. दोस्तांच्या जीवनावर आधारलेली ही मालिका तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. ही मालिका तरुणांच्या जवळ जाणारी असल्याने अल्पावधीत या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग गोळा केलाय. मालिकेतील कैवल्य, रेश्मा, मीनल, अॅना, सुजय आणि आशू यांची जबरदस्त केमिस्ट्रीमुळे या मालिकेने तरुणांसोबतच आबाललवृद्धांना भुरळ घातलीये. 

या दोस्तांच्या गँगमध्ये अनेकदा नवीन चेहरेही पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा या मित्रांच्या माजघरात नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. या पाहुण्याला तुम्हीही ओळखता बरं का. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून जुळून येती रेशीमगाठीमधील अभिनेता ललित प्रभाकर म्हणजेच सर्वांचा लाडका आदित्य होय. 

इतर तरुणाईप्रमाणे ललितही ही मालिका आवर्जून आणि आवडीने पाहतो. त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्याने या भूमिकेच्या प्रस्तावावर लगेचच होकारही दिला. पुढील आठवड्यापासून तो या मालिकेत दिसणार आहे. मात्र त्याची भूमिका काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील आठवड्याचा एपिसोड पाहावा लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.