सोनाक्षी दाऊदची बहिण साकारण्यासाठी ट्वीटरवर परतली

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विटर अकाऊंटपासून ब्रेक घेतला होता, मात्र सोमवारी 'हसीना'बद्दल अपडेट देण्यासाठी, सोनाक्षी ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. 

Updated: Jan 19, 2016, 02:42 PM IST
सोनाक्षी दाऊदची बहिण साकारण्यासाठी ट्वीटरवर परतली title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विटर अकाऊंटपासून ब्रेक घेतला होता, मात्र सोमवारी 'हसीना'बद्दल अपडेट देण्यासाठी, सोनाक्षी ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. 
सोनाक्षी सिन्हा सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. सोनाक्षीला चित्रपटाची कहाणी देखील आवडली आहे. 

या आधी १७ जानेवारी रोजी सोनाक्षीने ट्वीट केलं होतं. स्वत:च्या जवळ येण्यासाठी सर्वांपासून दूर जावं लागतं, ट्वीटर ब्रेक.

मात्र यानंतर एका दिवसात सोनाक्षी पुन्हा ट्वीटरवर पुन्हा परतली.

सोनाक्षीने ट्वीट केलं, आणि सांगितलं तिला हसीनाच्या बाबतीत अपडेट द्यायचं होतं.

सोनाक्षीने ट्वीट केलं, "मी या डेट्सवर काम करतेय, हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, मी आपल्या परीने खूप मेहनत घेतेय, प्रयत्न करतेय, ब्रेकनंतर पुन्हा परतलेय".