कृष्णा श्रॉफ आपल्या 'टॉपलेस' फोटोबाबत बोलली

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफनं आपल्या 'टॉपलेस' फोटोंबाबत येणाऱ्या बातमीवर प्रतिक्रिया दिलीय. कृष्णानं नुकताच दोन वेळा आपला 'टॉपलेस' फोटो इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलाय. कृष्णाच्या टॉपलेस फोटोबाबत वडील जॅकीलाही बोलावं लागलं होतं.

Updated: Oct 18, 2015, 07:39 PM IST
कृष्णा श्रॉफ आपल्या 'टॉपलेस' फोटोबाबत बोलली title=

मुंबई: अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफनं आपल्या 'टॉपलेस' फोटोंबाबत येणाऱ्या बातमीवर प्रतिक्रिया दिलीय. कृष्णानं नुकताच दोन वेळा आपला 'टॉपलेस' फोटो इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलाय. कृष्णाच्या टॉपलेस फोटोबाबत वडील जॅकीलाही बोलावं लागलं होतं.

जॅकीनं सांगितलं की, कृष्णा टॉपलेस नव्हती... तिनं टॉवेल गुंडाळला होता. यानंतर पुन्हा कृष्णानं इंस्टाग्रामवर पाठ दाखवत ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला. 

आणखी वाचा - कृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो

'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णानं सांगितलं की, 'टॉपलेस' लिहिलेलं पाहून मला हसायला आलं. कारण टॉपलेसचा अर्थ आपल्याला आपले निपल्स दाखवावे लागतात.

अभिनयाबद्दल कृष्णा म्हणाली,'लोकं विचार करतात की कोणतीही सुंदर मुलगी अचानक अभिनेत्री बनू शकते किंवा मॉडेलिंग सुरू करू शकते. मला मॉडेलिंगबाबत जास्त माहिती नाही, मी त्या जगातून नाहीय... मात्र अभिनयाबद्दल मला माहितीय. फिल्मच्या सेटवर आपल्या भावाला खूप मेहनत करतांना मी पाहते. सुंदर दिसणं आणि अभिनय येणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.'

आणखी वाचा - फोटो : अदिती राव हैदरीचं मॅगझिनसाठी 'टॉपलेस' फोटोशूट

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.