सलमान खानशी संबंधी १० खास गोष्टी, ज्या तुम्हांला नाही माहित

हिट अँड रन केसमध्ये मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला मोठा दिलासा दिला. त्याची हायकोर्टात जामीन याचिका मंजूर करण्यात आली. तसेच कोर्टाने सलमानच्या शिक्षेवरही स्थिगिती लावली आहे. 

Updated: May 8, 2015, 03:56 PM IST
सलमान खानशी संबंधी १० खास गोष्टी, ज्या तुम्हांला नाही माहित  title=

मुंबई : हिट अँड रन केसमध्ये मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला मोठा दिलासा दिला. त्याची हायकोर्टात जामीन याचिका मंजूर करण्यात आली. तसेच कोर्टाने सलमानच्या शिक्षेवरही स्थिगिती लावली आहे. 

प्रेक्षकांच्या हृदयावर राज करणारा दबंग सलमान खानच्या आयुष्याबाबत तुम्हांला काही गोष्टी माहीत नसतील. सलमानचे आयुष्य हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. पण त्यातील काही असे पाने आहेत जे अजूनही उलटले नाहीत.. 

जाणून घेऊ या  १० खास गोष्टी 

१) सलमान खान याचे संपूर्ण नाव अब्दुल राशिद सलिम सलमान खान आहे. 

२) पोहायची खूप आवड आहे. स्कूलमध्ये तो स्विमिंग चॅम्पियन होता. 

३) चांगला चित्रकार आहे सलमान... आपल्या 'जय हो' या चित्रपटाचे पोस्टर त्यानेच पेंट केले होते. 

४) सलमानने अॅक्टिंगची ट्रेनिंग डेझी इरानी इन्स्टिट्यूमधून घेतली. त्यावेळी त्याचा मित्र साजीद खान आणि चंकी पांडेही होता. 

५) त्याला अभिनयात रुची नव्हती, पण दिग्दर्शन त्याचा आवडता विषय होता. पण चित्रपट निर्मात्यांच्या सल्ल्यानंतर तो अभिनय क्षेत्रात आला. 

६) लेखन करण्याची आवड आहे सलमानला... 'वीर' आणि चंद्रमुख हे चित्रपट सलमानने लिहिले आहे. 

७) २००४ मध्ये युएसएच्या पिपल मॅग्झीनमध्ये सलमान खानला बेस्ट लुकिंग मॅन इन द वर्ल्ड च्या लिस्टमध्ये सातवे आणि भारतात पहिले स्थान मिळाले होते. 

८) सायकलिंगची आवड - मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालविताना दिसला आहे सलमान खान... चांगल्या शरिरासाठी तो याला आवश्यक मानतो. 

९) हिमेश रेशमिया, साजिद-वाजिद, संजय लीला भंसाळी, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा सारख्या स्टार मंडळींनना सलमानने लॉन्च केले. 

१०) संजय दस्त सलमानचा चांगला मित्र आहे. त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.