सलमानच्या 'पहिल्या गर्लफ्रेंड'च्या भाचीला होम प्रोडक्शनमध्ये लीड रोल

सलमान नेहमी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. आपल्या होम प्रोडक्शनच्या नव्या सिनेमात तो आपल्या मित्राच्या मुलाला म्हणजे जहीरला लॉन्च करणार आहे. हा सिनेमा दिलजीत दोसांज यांचा सुपरहिट 'जट्ट अँड जूलिएट' चा रिमेक आहे.

Updated: Apr 24, 2016, 11:34 AM IST
सलमानच्या 'पहिल्या गर्लफ्रेंड'च्या भाचीला होम प्रोडक्शनमध्ये लीड रोल title=

नवी दिल्ली : सलमान नेहमी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. आपल्या होम प्रोडक्शनच्या नव्या सिनेमात तो आपल्या मित्राच्या मुलाला म्हणजे जहीरला लॉन्च करणार आहे. हा सिनेमा दिलजीत दोसांज यांचा सुपरहिट 'जट्ट अँड जूलिएट' चा रिमेक आहे.

स्पॉटबॉय डॉट कॉमच्यासूत्रानुसार या सिनेमात जहीरबरोबर स्त्री मुख्य भूमिकेत कृती सेननच्या नावाची चर्चा होती. पण कृती सेननच्या जागी कियारा अडवाणीला या सिनेमात घेण्याची शक्यता आहे.

कोण आहे कियारा

कियाराचं खर नाव आलिया आहे, पण आधीचं बॉलीवुडमध्ये एक आलिया आहे म्हणून सलमानने स्वत: तिला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला. २०१४ मध्ये फगली या विनोदी सिनेमात कियाराने भूमिका केली होती. कियारा ही सलमानची 'पहिली गर्लफ्रेंड' शाहीन जाफरीची भाची आहे. तिचे वडील जगदीप आडवाणी एक बिजनेसमन आहेत. तर आई गेनेवीवे जाफरी शिक्षिका आहे.