मीडियासमोर त्याने घेतला प्रियांकाचा किस

प्रियांका चोप्रा पत्रकाराशी संवाद साधत असताना, एक प्रसंग घडला, प्रियांका मीडियाच्या कॅमेऱ्याना पोझ देत होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2017, 07:54 PM IST
मीडियासमोर त्याने घेतला प्रियांकाचा किस title=

मियामी : प्रियांका चोप्रा पत्रकाराशी संवाद साधत असताना, एक प्रसंग घडला, प्रियांका मीडियाच्या कॅमेऱ्याना पोझ देत होती, मध्येचअचानक ड्वेन जॉन्सन तिथे आला. त्याने प्रियांकाला मागच्या बाजूने पकडले आणि तिच्या गालांवर चुंबन दिले.  प्रियांकानेही ड्वेनच्या या कृतीला हसून दाद दिली. 

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हि़डओ तिने शेअर केला आहे. अमेरिकेत २५ मे रोजी तर, भारतात २ जूनला 'बेवॉच' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'बेवॉच'मधील प्रियांकाच्या रोलच्या लांबीवरुन चर्चा रंगली आहे.

बेवॉच'चा वर्ल्ड प्रिमीयर रविवारी फ्लोरिडा मियामीमध्ये संपन्न झाला. यावेळी ड्वेन जॉन्सनसह अॅलेक्सांड्रा दादारीयोसह सर्वच कलाकार उत्साहात दिसत होते. 

सध्या दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा या २ भारतीय अभिनेत्रींची हॉलिवूडमध्ये स्पर्धा सुरु आहे.  जानेवारी महिन्यात दीपिकाचा विन डिझलेबरोबर ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

आता चाहत्यांमध्ये प्रियांकच्या रोलची लांबी दीपिकापेक्षा जास्त असणार का ? त्यावरुन चर्चा रंगली आहे.  दीपिकाच्या चित्रपटाला भारतात म्हणावे तितके यश मिळाले नसले तरी, दीपिका या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.