'ख्वाडा'चे सीमोल्लंघन, शो हाऊसफुल

'ख्वाडा'च्या टीमने दस-याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केलय. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळवलेल्या ख्वाडाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. सिनेमातील तुझ्या रुपाला हे गाणं सध्या गाजत असून वेगळा बाज असलेलं हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलेय.

Updated: Oct 24, 2015, 07:54 AM IST
'ख्वाडा'चे सीमोल्लंघन, शो हाऊसफुल  title=

मुंबई : 'ख्वाडा'च्या टीमने दस-याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केलय. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळवलेल्या ख्वाडाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. सिनेमातील तुझ्या रुपाला हे गाणं सध्या गाजत असून वेगळा बाज असलेलं हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलेय.

अधिक वाचा : ख्वाडाचा दुसरा प्रोमो, खूप काही बोलतोय..!

नैसर्गिक ग्रामीण लोकेशन्स, कलाकारांची थरारक घोडेस्वारी, त्याचजोडीला गावरान कलाकारांचा रांगडा अभिनय हे सर्व पडद्यावर बघतानाची मजा निराळीच आहे. कलाकारांच्या निरागस अभिनयाला रसिक प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली असून सिनेमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय.

कुस्तीच्या फडातील घुमणारे आवाज, लाल माती आणि डिजेचा धुमाकुळ घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकेशन्सवर शूट केलेला हा अस्सल मराठमोळा रांगडा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ११२ चित्रपटगृहांमध्ये सुमारे ९२४ शोसह प्रदर्शित करण्यात आलाये. जवळपास सर्वच शोला दणक्यात ओपनिंग मिळालं असून शनिवार आणि रविवारचेही शो हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.