Bigg Boss 9: भावाच्या मृत्यूमुळे किथ सिक्वेराने मध्येच सोडले घर

 बिग बॉस -९ मधून किथ सिक्वेराला अर्ध्यातून घर सोडावे लागले आहे. किथच्या कुटुंबात वाईट घटना घडली. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून बाहेर पडावे लागले.

Updated: Nov 6, 2015, 11:40 PM IST
Bigg Boss 9: भावाच्या मृत्यूमुळे किथ सिक्वेराने मध्येच सोडले घर   title=

मुंबई :  बिग बॉस -९ मधून किथ सिक्वेराला अर्ध्यातून घर सोडावे लागले आहे. किथच्या कुटुंबात वाईट घटना घडली. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून बाहेर पडावे लागले.

अधिक वाचा : बिग बॉस-९ : किथ सिक्वेराची पत्नी समयुक्ता सिंग हिची वाईल्ड कार्डने एंट्री?

 बिग बॉसकडून सांगण्यात आले की, किथच्या  भावाचे निधन झाले. त्यामुळे त्याला बिग बॉस सोडावे लागले आहे. घर सोडण्याआधी किथ आपल्या गर्लफ्रेंड रोशेलला भेटला. मात्र, एक चांगली बातमी आहे की, किथ काही दिवसानंतर पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार आहे.

किथ 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्याने त्याची प्रेमिका रोशेल मारिया राव एकटीच राहणार आहे. रोशेलचे बिग बॉसच्या घरात जास्त मित्र नाहीत. त्यामुळे किथ बाहेर पडल्याने ती एकटीच पडणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.