कतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे.

Updated: Sep 16, 2016, 11:53 AM IST
कतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा? title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे. कतरिना मुंबई विमानतळावरून लंडनला जात आहे याची कुणकुण पत्रकारांना लागली, तेव्हा पत्रकार मुंबई विमानतळावर पोहोचले. 

विमानतळावर पत्रकार आल्याचं लक्षात आल्यावर कतरिना तिच्या गाडीतूनच बाहेर आली नाही. जोपर्यंत पत्रकार इथून जात नाहीत, तोपर्यंत मी बाहेर येणार नसल्याचं कतरिना म्हणाली. या सगळ्या वादामध्ये लंडनला जाणारं विमान सोडायलाही कतरिना तयार झाली होती. अखेर पत्रकार विमानतळावरून गेल्यावर ती गाडीच्या बाहेर आली. 

कतरिनाचा बार बार देखो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तसंच सलमान आणि कतरिनाच्या एक था टायगरचा सिक्वल 'टायगर जिंदा है'ची घोषणाही करण्यात आली आहे. हे सगळे प्रश्न टाळण्यासाठी कतरिनाला पत्रकारांना सामोरं जायचं नसल्याच्या चर्चा आहेत.