करिनाने भरून काढली कतरिनाची जागा

ऐनवेळी कतरिनाची तब्येत बिघडली आणि ऐनवेळी आता कतरिनाची कोण जागा घेणार याची धावपळ सुरू झाली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2017, 03:33 PM IST
करिनाने भरून काढली कतरिनाची जागा title=

मुंबई : झी सिने एवार्डमध्ये कतरिनाचा एक खास परफॉर्मन्स होता. मात्र ऐनवेळी कतरिनाची तब्येत बिघडली आणि ऐनवेळी आता कतरिनाची कोण जागा घेणार याची धावपळ सुरू झाली. 

अशावेळी कतरिनाच्या मदतीला धावून आली ती बेबो करिना. करिनाने झी एवार्ड्स सोहळ्यात केवळ कतरिनाची जागा भरून काढली असं नव्हे तर करिनाने धमाकेदार परफॉर्मन्स करत सगळ्यांनाच चकीत केलं.

नुकतीच प्रेग्नन्सीतून सावरलेली करिना एवढ्या उत्साहाने एवढ्या पटकन तयार होईल, याची आयोजकांनाही माहिती नव्हती. पण म्हणतात ना करिना म्हणजे पक्की प्रोफेशनल गर्ल. कामात बिझी कसं रहायचं हे शिकावं ते करिनाकडूनच असं तिचे मित्र उगाच का म्हणतात.