कपिल शर्माचे नव्या वर्षात येणार दोन नवे शो

२०१६ मध्ये 'द कपिल शर्मा शो'ने मोठं यश मिळवलं. कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आज त्याचे अनेक चाहते आहेत. अशा चाहत्यांना कपिल शर्मा एक आनंदाची बातमी देणार आहे. कपिल शर्मा २०१७ मध्ये प्रेक्षकांसाठी २ नवे कॉमेडी शो घेऊन येणार आहे.

Updated: Jan 2, 2017, 03:10 PM IST
कपिल शर्माचे नव्या वर्षात येणार दोन नवे शो title=

मुंबई : २०१६ मध्ये 'द कपिल शर्मा शो'ने मोठं यश मिळवलं. कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आज त्याचे अनेक चाहते आहेत. अशा चाहत्यांना कपिल शर्मा एक आनंदाची बातमी देणार आहे. कपिल शर्मा २०१७ मध्ये प्रेक्षकांसाठी २ नवे कॉमेडी शो घेऊन येणार आहे.

कपिलने ट्विटवर याबाबत ट्विट केलं आहे. अजून या दोन्ही शोचं नाव काय असणार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कपिल शर्माने याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.