मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्माने फेटाळले

अनेक दिवसांच्या मौनानंतर सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने आपले मौन सोडले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्मा याने फेटाळला आहे. 

Updated: Nov 22, 2015, 04:30 PM IST
मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्माने फेटाळले  title=

मुंबई : अनेक दिवसांच्या मौनानंतर सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने आपले मौन सोडले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्मा याने फेटाळला आहे. 

आपल्या भूमिका स्पष्ट करताना कॉमेडी नाइट्स विथ कपिलचा होस्ट कपिल म्हणाला, मला माहिती नाही की ही बातमी कशी आली. सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की मी त्या कार्यक्रमाला उपस्थितच नव्हतो. राईचा पहाड कोणी केला हे मला समजत नाही आहे. मला सर्वजण पसंत करतात. पण असे काही लोक आहेत, ते अशा बातम्या पसरवतात, असे एनडीटीव्हीशी कपिल बोलत होता. 

पेटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी हजर होतो. या वर्षीचा पेटा पर्सन ऑफ द इअर पुरस्कार मला मिळाला आहे. 

काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती कपिल शर्मा याने मराठी अभिनेत्री दीपाली सैय्यद हिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तनिशा मुखर्जी आणि मोनाली ठाकूर यांच्याशी तसाच वागला होता. 

यावेळी टीव्ही अभिनेता शरद केळकर याने कपिलला खाली बसवले होते. महिलांशी अशा प्रकारे वागू नको असे समजवले होते. यापूर्वीही कपिल आपल्या वाचाळपणामुळे अडचणीत आला होता. त्याने नुकतेच किस किस का प्यार करूमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.