कपिलच्या प्रेयसीनं केलं लंडनच्या उद्योगपतीशी लग्न

अल्पावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर कॉमेडी जगतात नाव मिळवणाऱ्या कपिल शर्मालाही ‘ब्रेक अप’ला सामोरं जावं लागलंय, हे खुद्द कपिलनंच उघडपणे सांगितलंय. 

Updated: Aug 12, 2014, 10:20 AM IST
कपिलच्या प्रेयसीनं केलं लंडनच्या उद्योगपतीशी लग्न title=

नवी दिल्ली : अल्पावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर कॉमेडी जगतात नाव मिळवणाऱ्या कपिल शर्मालाही ‘ब्रेक अप’ला सामोरं जावं लागलंय, हे खुद्द कपिलनंच उघडपणे सांगितलंय. 

कॉलेजमधील दिवसांत फुललेलं आपलं प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही पण आपल्याला याविषयी खेद वाटत नाही, असंदेखील कपिलनं म्हटलंय. उलट आपण आत्ताही मुक्त पक्षाप्रमाणे हुंदडू शकतो, याचाच त्याला आनंद वाटतोय.  

एका मुलाखती दरम्यान कपिलनं आपल्या आयुष्यातला हा हळवा कोपरा उघड केलाय. आपल्या थिएटर ग्रुपमधील एका मुलीच्या प्रेमात कपिल पडला होता. परंतु, काही काळानंतर एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ती लंडनला रवाना झाली आणि त्यानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. लंडनमधल्याच एका बिझनेसमनशी लग्न करण्याचा आणि तिथंच स्थायिक होण्याचा तिनं निर्णय घेतला.

यामुळे, कपिलचं हृदय तुटलं किंवा नाही याबद्दल मात्र कपिलनं मौन बाळगलं. ‘आम्ही थिएटरमध्ये एकत्र काम करायचो. त्यानंतर एके दिवशी इतर सात मुलींसोबत तिला लंडनहून प्रिन्स चार्ल्सकडून एका सांस्कृतिक कार्यक्रमात ‘गिड्डा’साठी बोलावणं आलं. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. लंडनमधल्याच एका गुजराती स्टोअर मालकाशी तिनं लग्न केलं... आणि संयोगानं माझी आणि तिची नुकतीच लंडनमध्ये भेट झाली’ असं कपिलनं म्हटलंय.

या झाल्या कॉलेजच्या दिवसांतील पहिल्या प्रेमाच्या आठवणी... पण, आता मात्र सध्या कपिल कुणाच्या प्रेमात आहे किंवा नाही हा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडलाय... आता या प्रश्नावर कपिल कधी चुप्पी तोडतोय, याची उत्सुकताही त्यांना लागलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.