हास्य अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचं मृत शरीर आढळलं

जेष्ठ हॉलीवूड अभिनेते, कॉमेडियन आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स काळाच्या पडद्याआड गेलेत. वयाच्या 63 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated: Aug 12, 2014, 09:58 AM IST
हास्य अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचं मृत शरीर आढळलं title=
रॉबिन विल्यम्स यांचा अलिकडच्या काळातील एक फोटो

कॅलिफोर्निया : जेष्ठ हॉलीवूड अभिनेते, कॉमेडियन आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स काळाच्या पडद्याआड गेलेत. वयाच्या 63 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विल्यम्स यांच्या कॅलिफोर्निया स्थित बंगल्यावर रात्री उशीरा त्यांचं मृत शरीर आढळलं. विल्यम्स यांनी तणावाखाली आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतंय. मात्र अजूनही मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

अमेरिकन मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक काळापासून रॉबिन विल्यम्स तणावग्रस्त होते. रॉबिन विल्यम्स यांच्या मृत्यूमुळे त्यांची पत्नी सुझान श्नायडर यांना मोठा धक्का बसला आहे. रॉबिन यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्य आहेत.


 

मागील काही काळापासून ते ड्रग्ज आणि दारुच्या व्यसनाधीन झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते एका सुधारगृहातून परतले होते आणि व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

गुड मार्निंग व्हिएतनाम, गुड विल हन्टिंग, जुमान्जी, डेड पोएट्स सोसायटी यांसारख्या दर्जेदार आणि मोठ्या चित्रपटांमधून दर्जेदार अभिनयाने कोट्यावधी प्रेक्षकांची मने जिंकली. तीन वेळा ऑस्करसाठी त्यांना नामांकन मिळालं होतं. ‘गुड विल हन्टिंग’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहय्यक अभिनयात ऑस्करनं गौरवण्यात आलं होतं. ‘मॉर्क अँन्ड मिंडी’नं त्यांना एक टीव्ही हास्य अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.