दबंग खानसोबत काम करण्यास कंगनाचा नकार

आपल्या कामातून आणि अभिनयातून बॉलिवूडची 'क्वीन' बनलेल्या कंगना रानौतनं चक्क बॉलिवूडच्या दबंग खानसोबत काम करण्यास नकार दिलाय. 

Updated: Jun 9, 2015, 06:11 PM IST
दबंग खानसोबत काम करण्यास कंगनाचा नकार title=

मुंबई : आपल्या कामातून आणि अभिनयातून बॉलिवूडची 'क्वीन' बनलेल्या कंगना रानौतनं चक्क बॉलिवूडच्या दबंग खानसोबत काम करण्यास नकार दिलाय. 

'सुलतान' या चित्रपटात अभिनेता सलमान खान याच्यासोबत पहिल्यांदाच कंगना पाहायला मिळू शकते, अशी चर्चा सुरू होती. परंतु कंगनाच्या नकारानंतर या साऱ्या चर्चांना पूर्णविराम लागलाय.

विशाल भारद्वाजच्या 'रंगून' या चित्रपटाच्या तारखांचं कारण कंगनानं दिलंय. 'रंगून' आणि 'सुलतान' या दोन्ही चित्रपटाच्या शूटींगच्या तारखा एकाच वेळी येत असल्यानं हा चित्रपट करण्यास कंगनानं नकार दिलाय, असं म्हटलं जातंय. 

'रंगून' हा चित्रपट कंगनानं फार पूर्वी घेतला होता. यात शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत कंगनाची मुख्य भूमिका आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.