'कट्टी-बट्टी'साठी कंगनाची 'लिव्ह इन'वारी

निखिल अडवाणी लवकरच 'कट्टी बट्टी' हा सिनेमा घेऊन येत आहे, हा चित्रपट 'लिव्ह इन' सारख्या कन्सेप्टवर आधारीत आहे, कंगना आणि इम्रान चित्रपटात मुख्य भूमिका पार पाडणार आहेत.

Updated: Jul 22, 2015, 04:19 PM IST
'कट्टी-बट्टी'साठी कंगनाची 'लिव्ह इन'वारी title=

मुंबई : निखिल अडवाणी लवकरच 'कट्टी बट्टी' हा सिनेमा घेऊन येत आहे, हा चित्रपट 'लिव्ह इन' सारख्या कन्सेप्टवर आधारीत आहे, कंगना आणि इम्रान चित्रपटात मुख्य भूमिका पार पाडणार आहेत.

चित्रपटाची भूमिका व्यवस्थित समजून घेण्यासाठी कंगना आणि इम्रान, सध्या 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या १६ जोडप्यांना भेटण्यासाठी गेले होते. या सर्व जोड्यांसोबत त्यांनी आपला काही वेळ दिला आणि या दोन्ही कलाकारांनी ते कसं राहतात, त्यातील काही अनोख्या गोष्टी आणि एकमेकांशी वागण्याची पद्धत हे जाणून घेतलं.

एवढंच नाही, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान कंगना आणि इम्रान एक को-अॅड होस्टेलमध्ये देखील राहिले, दोघांनाही एक वेगळा अनुभव मिळाला आणि त्यांनी खूपच एन्जॉय केल्याचं त्यांनी सांगितलं, ते सर्व क्षण त्यांच्या कायम आठवणीत राहणार आहेत.कट्टी बट्टी हा सिनेमा १८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.