काजोल दिसणार छोट्या पडद्यावर

हल्ली चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार एखाद्या प्रसिद्ध मालिकेत दिसून येतात. या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांचे चांगले प्रमोशनही होते. हाच फंडा दिलवालेच्या प्रमोशनात वापरला जाणार आहे. 

Updated: Nov 29, 2015, 10:51 AM IST
काजोल दिसणार छोट्या पडद्यावर title=

मुंबई : हल्ली चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार एखाद्या प्रसिद्ध मालिकेत दिसून येतात. या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांचे चांगले प्रमोशनही होते. हाच फंडा दिलवालेच्या प्रमोशनात वापरला जाणार आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवालेच्या प्रमोशनसाठी सर्वच अभिनेत्यांनी कंबर कसलीये. यात अभिनेत्री काजोलही मागे नाही. बॉलीवूड गाजवणारी ही अभिनेत्री आता छोट्या पडद्यावरही दिसणार आहे. दिलवालेच्या प्रमोशनसाठी ती एका सिरियलमध्ये छोटीशी भूमिका करणार आहे. 

आणखी वाचा दिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स

 

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका साथ निभाना साथिया या मालिकेत भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. यात ती प्रेमाचा संदेश देताना दिसेल. यासाठी काजोल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.