७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

Updated: Feb 2, 2016, 08:18 PM IST
७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

परवीन दुसांज ४२ वर्षांची आहे तर कबीर ७० वर्षांचे आहेत. दोघंही गेल्या १० वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. 

दीर्घकाळ सुरू असलेल्या रिलेशीनशिपमध्ये दोघांनी आपलं भविष्य लक्षात घेतलं... आणि सतर्कता म्हणून त्यांनी 'एग्स' फ्रीज करवून घेतले. यामुळे, वय उलटल्यानंतरही पालक बनण्यात या दोघांनाही अडचणींना सामोरं जावं लागणार नाहीय. 

१६ जानेवारी २०१६ रोजी कबीर यांनी आपल्याहून २९ वर्षांनी लहान असणाऱ्या परवीन दुसांज हिच्याशी विवाह केलाय. कबीर यांचा हा चौथा विवाह आहे.