जोधपूर : अभिनेता सलमान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काळवीट शिकार प्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याचा सलमानवर आरोप आहे. या प्रकरणात जोधपूर जिल्हा न्यायालय आज बुधवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानला आज न्यायालयात उपस्थित राहाण्यास सांगण्यात आले आहे. १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सलमान खानसह आणखी काही बॉलिवूड कलाकारांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप होता.
१५ ऑक्टोबर १९९८ ला सलमान खानविरोधात जोधपूरच्या वन विभागाने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोन काळवीटांच्या शिकार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी संपली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.