सेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड

सेल्फी मागणाऱ्या एका फॅनला जॉन अब्राहमनं थप्पड मारल्याचं बोललं जात आहे.

Updated: Sep 30, 2016, 06:43 PM IST
सेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड title=

मुंबई : सेल्फी मागणाऱ्या एका फॅनला जॉन अब्राहमनं थप्पड मारल्याचं बोललं जात आहे. फोर्स-2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडल्यानंतर जॉन बाहेर पडला. यावेळी जॉनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. गर्दीतल्या एका फॅननं जॉनचा हात धरला आणि त्याला सेल्फी काढण्यासाठी आग्रह केला. जॉनला ही गोष्ट पटली नाही आणि भडकलेल्या जॉननं या फॅनवर सगळा राग काढला.

भडकलेल्या जॉन अब्राहमनं मीडियाच्या प्रतिनिधींनाही धमकी दिल्याचं बोललं जात आहे. याचं शूटिंग कराल तर महागात पडेल, असं जॉन मीडियाच्या प्रतिनिधींना म्हणाला.