... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.

Updated: Feb 1, 2017, 10:16 AM IST
... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.
 
अमिताभ बच्चन यांनी संध्याकाळी ७.१६ मिनिटांनी ही गोष्ट ट्विट केली. वोडाफोनच्या सिममधून एसएमएस जात नसल्याचं त्यांनी ट्विट केलं होतं. पुढच्या अर्ध्या तासातच त्यांनी पुन्हा ट्विट केलं. की धन्यवाद वोडाफोनची समस्या दूर झाली आता सगळे एसएमएस जातायंत.

ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचे २.४७ कोटी फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींनंतर ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदींचे २.६८ कोटी फॉलोअर्स आहेत.