सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली. 

Updated: Nov 8, 2016, 01:34 PM IST
सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार title=

जम्मू : बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली. 

माझे भाग्य आहे मी मला या ठिकाणी येता आले. मी नेहमी म्हणतो मी रील हिरो आहे मात्र देशाचे संरक्षण करणारे जवान हे भारताचे खरे हिरो आहेत, असे अक्षय़ यावेळी म्हणाला. 

हतसंच जवानांसाठी एक मोबाईल ऍप असावं असंही खिलाडीनं सुचवलंय. याआधी अक्षयने शहीद गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली होती. तसेच त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनही सैन्यदलाचे आणि जवानांचे आभार मानले होते