'जग्गा जासूस'नं तोडला 'हम आपके है कौन'चा रेकॉर्ड...

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' अखेर यंदा प्रदर्शित होण्याच्या तयारी आहे. या सिनेमानं सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या 'हम आपके है कौन' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडल्याचं समजतंय. 

Updated: Feb 9, 2017, 12:29 PM IST
'जग्गा जासूस'नं तोडला 'हम आपके है कौन'चा रेकॉर्ड...  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' अखेर यंदा प्रदर्शित होण्याच्या तयारी आहे. या सिनेमानं सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या 'हम आपके है कौन' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडल्याचं समजतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात 5-10 नाही तर तब्बल 29 गाण्यांचा समावेश आहे... हा एक म्युझिकल सिनेमा आहे... आणि यातील गाणी श्रवणीय बनवण्याची जबाबदारी प्रीतमच्या खांद्यावर सोपवली गेलीय. 

याआधीही, बॉलिवूडमध्ये 'इंद्रसभा' या सिनेमात तब्बल 72 गाण्यांचा समावेश होता तर बॉक्स ऑफिस हिट ठरलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमात तब्बल 14 गाण्यांचा समावेश होता. 

'जग्गा जासूस' या सिनेमात संपूर्ण सिनेमाभर रणबीर कपूरला बोलताना अडथळून बोलताना दिसणार आहे. त्याचं अडथळून बोलण्याची सवय फक्त एका वेळी नसेल ती म्हणजे गाणं गाताना...  

या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. रणबीर आणि अनुराग बसू यांना या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महत्त्वाचं म्हणजे, सध्या रणबीरला एका मोठ्या हीटची गरज आहे.