मुंबई : काळा पैशाविरोधात केंद्र सरकारने श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या गुप्त संपत्तीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
इन्कम टॅक्स विभागाने शाहरुखकडे बर्म्युडा, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड आणि दुबईसारख्या परदेशातील गुंतवणुकीचा अहवाल मागितला आहे. आयकर अधिकाऱ्यांकडे भारतीय नागरिकांच्या परदेशी गुंतवणुकांबाबत सखोल माहिती आहे. मात्र शाहरुखच्या परदेशी गुंतवणुकांमध्ये काळ्या पैशाचा समावेश आहे, की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.