मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.
'सोहानं लग्नाचा निर्णय घेतलाय... कुटुंबातील सर्वच जण खूप आनंदात आहेत... सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा केव्हा कुणाल सोहाच्या आसपास असतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य असतं... जे आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मी खूप खूश आहे की त्यांनी लग्नाचा निर्णय घेतलाय' असं करीनानं म्हटलंय.
गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू या जोडप्यानं लंडनमध्ये एकमेकांना होकार दिलाय. कुणालनं पॅरीसमध्ये असताना सोहाला प्रपोज केलं आणि सोहानंही कुणालचा प्रस्ताव स्वीकार केलाय.
लग्नाची तारीख मात्र अद्याप ठरलेली नसली तरी हे लग्न सैफ अली खानच्या पितृक निवासस्थानावर म्हणजेच पटौदीमध्ये पार पडेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.