मुंबई : राजस्थानात एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर आज या अपघातात गंभीर जखमी झालेली अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी, त्यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या चिमुकलीच्या वडिलांवर ट्राफिक नियमांचं पालन न केल्याचा आरोपही केलाय.
'या अपघातात नाहक प्राण गमावणाऱ्या मुलीसोबत आणि तिच्या जखमी कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. 'जर मुलीच्या वडिलांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं असतं तर ही घटना टाळता आली असती आणि त्या चिमुरडीचे प्राणही वाचले असते' असं हेमा मालिनी यांनी ट्विटरवर म्हटलंय.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात 2 जुलै रोजी हेमा मालिनी यांच्या गाडीशी दुसऱ्या गाडीची धडक झाली होती. या अपघातात एका चार वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लगाला तर हेमामालिनी यांच्यासोबत पाच जण गंभीर जखमी झाले.
यानंतर, 66 वर्षीय अभिनेत्रीवर गेल्या आठवड्यात जयपूरच्या एका हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन झालं. दुर्घटनेनंतर, जर मुलीला वेळेत हॉस्पीटलमध्ये हलवलं असतं तर तिचे प्राण वाचले असते असं तिच्या वडिलांनी म्हटलं होतं.
My heart goes out to the child who unnecessarily lost her life and the family members who have been injured in the accident. Contd
— Hema Malini (@dreamgirlhema) July 8, 2015
(Contd) How I wish the girl's father had followed the traffic rules - thn this accident could have been averted & the lil one's life safe!
— Hema Malini (@dreamgirlhema) July 8, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.