विद्या बालन कंगनाच्या पाठिशी...

अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील तू तू मैं मैं काही संपायचं नाव घेत नाहीय... त्यातच आता बॉलिवूडमधल्या आणखी एका सशक्त अभिनेत्रीनं कंगनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. 

Updated: May 5, 2016, 07:01 PM IST
विद्या बालन कंगनाच्या पाठिशी...  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील तू तू मैं मैं काही संपायचं नाव घेत नाहीय... त्यातच आता बॉलिवूडमधल्या आणखी एका सशक्त अभिनेत्रीनं कंगनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. 

ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये 'खान्स'ला स्वबळावर टक्कर देणारी अभिनेत्री विद्या बालन... नुकतीच, 'TE3N' या आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान विद्या मीडियासमोर आली होती. 

'कुडोज टू कंगना'

यावेळी, विद्याला प्रतिक्रिया विचारली असता विद्यानं, 'या प्रकरणात मी बोलणं योग्य नाही. परंतु, मला स्वत:ला कंगनाबद्दल खूप आदर आहे' असं विद्यानं म्हटलंय. 

'कंगना स्वत:साठी उभी राहिलीय. दुसऱ्यांसाठी उभं राहणं, स्टँन्ड घेणं खूप सोप्पं असतं परंतु, फार कमी वेळा लोक स्वत:साठी उभी राहतात. कुडोज टू हर... तिला बळ मिळो...' असं म्हणत विद्या सरळ सरळ कंगनाच्या बाजुनं उभी राहिलीय.