मी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.

IANS | Updated: Apr 28, 2015, 02:19 PM IST
मी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.

तुझं लग्न खूप गुपचूप पद्धतीनं होणार का? या प्रश्नावर रणबीरनं उत्तर दिलंय. रणबीर म्हणतो, 'माझ्या मते आपण लग्नाला खाजगी आपल्यापुरतंच मर्यादित ठेवू शकत नाही. आम्ही कलाकार आहोत. माझ्या लग्नाची तारीख ६ वर्षांपूर्वीच ठरली होती.  हा एक खास दिवस असेल, म्हणून मलाच त्याची घोषणा करू द्या, सध्या लग्नाचा काही विचार नाहीय.'

रणबीर पुढे म्हणतो, 'मी प्रेमात पडलोय. मला कुणाबद्दल कमिटमेंट आणि जबाबदारीची जाणीव होते. जेव्हा प्रश्न लग्नाचा आहे, तर अती अंदाजामुळं माझी चीडचीड वाढते. मी मीडियाला प्रार्थना करतो की, माझ्या लग्नाच्या तारखेबाबत अंदाज घेणं बंद करा.'

रणबीर लवकरच 'बॉम्बे वेल्वेट' चित्रपटात दिसणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट १५ मेला रिलीज होणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि निर्माता करण जोहर सुद्धा चित्रपटात दिसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.