मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या शाहिद कपूरची फॅन बनलीय... मी शाहिदची खूप मोठी फॅन आहे, असं आलियानं स्वत:च उघड केलंय.
निर्माता विकास बहल याच्या ‘शानदार’ या चित्रपटात शाहिद कपूर आणि आलिया भट्ट एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळेच, आलियाला आता शाहिदवर बोलण्याचा चान्सही मिळालाय.
शाहिदचा पहिला सिनेमा ‘इश्क विश्क’ आपल्याला खूप आवडतो आणि आपण वयाच्या 11 व्या वर्षी हा सिनेमा पहिल्यांदा पाहिला होता, असं आलियानं म्हटलंय.
‘मी शाहिद कपूरची खूप मोठी फॅन आहे. मी 11 वर्षांची असेन जेव्हा गेइटी-गॅलक्सी (मुंबई) सिनेमागृहात शाहिदचा पहिला सिनेमा ‘इश्क विश्क’ पाहायला गेले होते. तेव्हापासूनच मी त्याची फॅन बनलेय. तो खूप चांगला अभिनेता आहे आणि मी असं ऐकलंय की तो सगळ्यांची मदतही करतो’, असं यावेळी आलियानं म्हटलंय.
आलियानं आत्तापर्यंत ज्या पिढीच्या अभिनेत्यांसोबत सिनेमांत काम केलीत, त्या पीढीपेक्षा शाहिद थोडा पुढेच आहे. यावर आलियाला विचारलं गेलं तेव्हा आलिया म्हणते, ‘तुम्ही हे विसरताय की मी रणदीप हुड्डासोबत हाय-वे केला होता. पण, याव्यतिरिक्त मात्र मी माझ्याच वयाच्या अभिनेत्यांबरोबर काम केलीत. पण, असं नाहीय की शाहिद वरुण धवन, अर्जुन कपूर किंवा सिद्धार्थ मल्होत्राहून वेगळा आहे. तो खूपच बिनधास्त व्यक्ती आहे’.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.