नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू असतानाच तिच्या बचावासाठीही हृतिक पुढे सरसावलाय.
त्याचं झालं असं की, हृतिक-कंगनाच्या कायदेशीर लढाईवर ट्विटरवर सुरू चर्चांमध्ये एक ट्रेंड कंगनाला चरित्रहीन म्हणत होता... हे सगळं कंगना पब्लिसिटीसाठी करत असल्याचं यात म्हटलं जातंय. यावरच हृतिकनं टीका केलीय असं दिसतंय.
It is characterless to judge another. Whatever may be the case. Strangle d anger. channelize love
— Hrithik Roshan (@iHrithik) May 1, 2016
दुसऱ्यांना जज करनं करॅक्टरलेस आहे. काहीही झालं तरी राग आवरायला हवा आणि प्रेम वाढवायला हवं, असं हृतिकनं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, एक अज्ञात व्यक्ती आपल्या नावाच्या ईमेल आयडीनं आपल्या चाहत्यांना ईमेल पाठवत असल्याची एफआयआर हृतिकनं नोंदवलीय. त्यानंतर सायबर क्राईम ब्रान्च अधिकाऱ्यांसमोर कंगना आणि तिची बहिण रंगोली यांनी आपला जबाब नोंदवलाय. पोलिसांनी मात्र या प्रकरणासंदर्भात आणखी काही माहिती देण्यास नकार दिलाय.