मॅड्रिड : सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद काही नवीन नाही. या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. IIFA च्या पत्रकार परिषदेसाठी हृतिकनं सलमानसोबत स्टेज शेअर करायला नकार दिला.
मॅड्रिडमध्ये IIFAच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, सलमान खान आणि हृतिक रोशन पोहोचले, पण हृतिकनं मात्र सलमान तिकडे असल्यामुळे स्टेजवर जायला नकार दिला. बॉलीवूड लाईफ या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे.
हृतिक रोशन आणि सलमान एकमेकांशी बोलतही नाहीत आणि जर कोणत्या पुरस्कार सोहळ्याला हे दोघं एकत्र आले तरी एकमेकांना टाळतात. हृतिकचा चित्रपट गुजारिशवर सलमाननं टीका केली होती. गुजारिश चित्रपट बघायला कुत्रापण जाणार नाही, असं सलमान म्हणाला होता. आता या टीकेचा बदला हृतिकनं सलमानचा अपमान करून घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.