'होणार सून मी...तूर्तास तरी बंद होणार नाही'

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' मालिका बंद होणार नसल्याचं झी मराठीकडून स्पष्ट करण्यात आलंय. डिसेंबरच्या शेवटच्या अथवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात ही मालिका संपणार असल्याचे वृत्त होते. 

Updated: Dec 7, 2015, 11:33 AM IST
'होणार सून मी...तूर्तास तरी बंद होणार नाही' title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' मालिका बंद होणार नसल्यांच झी मराठीनं स्पष्ट केलंय. डिसेंबरच्या शेवटच्या अथवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात ही मालिका संपणार असल्याचे वृत्त होतं. मात्र यात काही तथ्य नाही आहे. 

होणार सून मी मधील श्री-जान्हवी या जोडीच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे पहिल्या दिवसापासूनच या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. केवळ श्री आणि जान्हवीच नव्हे तर मालिकेतील इतर पात्रांनीही प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडण्यास भाग पाडले. 

या मालिकेचे काही दिवसापूर्वीच ७५० भाग झाले. या सर्वच भागांना प्रेक्षकांनी चांगली पसंतीही दिली. सध्या या मालिकेतील गाजलेला विषय म्हणजे जान्हवीचे बाळंतपण. यावरुन सोशल मीडियावर चांगलेच किस्से रंगले. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर जान्हवीचे बाळंतपण कधी होणार या प्रश्नाने धुमाकूळ घातलाय. 

दरम्यान, ही मालिका तूर्तास तरी बंद करण्याचा विचार नसल्याचं झी मराठीचे बिझनेस प्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी स्पष्ट केलं. आज काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून मालिका महिन्यभरात बंद होणार असल्याची बातमी दिली होती. या बातमीचं झी मराठीनं संपूर्णपणे खंडन केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.